अक्कलकोट,दि.२४ : सोलापूर व अक्कलकोट रोटरी परिवारातर्फे अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त गावातील नागरिकांना मदत करण्यात आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील पूरस्थिती पाहून रोटरी परिवार अक्कलकोट व सोलापूर या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावून आले. यात रोटरी क्लब सोलापूर, रोटरी क्लब जुळे सोलापूर, रोटरी क्लब ईस्ट सोलापूर व अक्कलकोट रोटरी क्लब यांच्यावतीने अक्कलकोट तालुक्यातील रामपूर, इटगे मिरजगी, गौडगाव इत्यादी गावातील नागरिकांना या संकटसमयी अन्न, पिण्याचे पाणी,बिस्किटे, उपवास फराळाचे साहित्य देऊन मदतीचा हात दिला.अक्कलकोट तालुक्यातील या पूरग्रस्त गावातील सर्व नागरिकांना पुर ओसरल्यावर बऱ्याच अडचणीना सामना करावा लागला, पुरामुळे अनेक घरात पाणी घुसून चिखल झाला होता त्यामुळे स्वयंपाक करण्यास अनेक अडचणी होत्या, ही सर्व भीषण परिस्थिती पाहून रोटरी परिवारातर्फे यावेळी अन्न पाकिटे, मिनरल पाणी बॉटल्स, खिचडी, बिस्कीट पुडे, शाबूदाना चिवडा, केळी आदींचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष रो. सुहास लाहोटी ,रो. विशाल वर्मा रो.सुरज तापडिया, रोटरी क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष रो. जितेंद्रकुमार जाजू ,सचिव रो ऍड सुनील बोराळकर रो. वैजिनाथ तलिकोटी रो. सोनल जाजू ,रोटरी क्लब जुळे सोलापूरचे अध्यक्ष रो. सचिन चौधरी,रोटरी क्लबचे ईस्ट सोलापूरचे रो.सुनील अग्रवाल ,रोहिणी फुलारी,ओंकार जाजू आदी उपस्थित होते.या संकट समयी रोटरी क्लब परिवार धावून आला व मदतीचा हात दिल्याबद्दल सर्व पूरग्रस्त ग्रामस्थांतर्फे त्यांचे कौतुक केले जात आहे.