अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट येथील सखी
ग्रुप तर्फे दरवर्षी दिवाळीनिमित्त आगळावेगळा समाजोपयोगी कार्यक्रम राबविला जातो.यंदाच्या दिवाळीतही अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावच्या शंभर पूरग्रस्त कुटुंबाना दिवाळी भेट देण्यात आली.
अक्कलकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरी नदीकाठची अनेक गावे पूरग्रस्त झालेली आहेत. पूरग्रस्त बबलाद गावांमध्ये शंभर कुटुंबांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते व या गरीब नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या महापुरानंतर पूरग्रस्त नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. ही परिस्थिती लक्षात घेऊन सखी ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी या वर्षीची दिवाळी बबलाद गावच्या पूरग्रस्त नागरिकांसोबत साजरी करण्याचे ठरविले व तसे नियोजन करण्यात आले.याप्रसंगी या पूरग्रस्त नागरिकांना चिवडा, लाडू, दिवाळी फराळ बनविण्यासाठीचे साहित्य, साखर,बेसनपीठ,रवा, गोडेतेल , उटणे, दिवेपणत्या, साबण,सुगंधी तेल, मास्क, सॅनिटायझर, आदिचा समावेश असलेले किटस वितरण करण्यात आले. यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी परिसरातील स्वच्छता करून नागरिकांना कोविड-१९ च्या काळात राखावयाच्या स्वच्छतेबाबत व घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. सुखी ग्रुपच्या सर्व समाजोपयोगी उपक्रमामुळे बबलाद येथील पूरग्रस्त गरीब नागरिकांना या दुःखातून बाहेर पडण्यास मदत होऊन दिवाळी आनंदात साजरी होणार आहे,असे उद्गगार याप्रसंगी बोलताना काढले. यावेळी राजशेखर लकाबशेट्टी, शरणप्पा फुलारी,अंनाप्पा कुंभार, सैपन जमादार, आमसिद्ध पुजारी, आनंद देगाव, सुशीला कलशेट्टी, संगीता सालेगाव, चन्नम्मा सुतार,व सखी ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सखी ग्रुपच्या मल्लमा पसारे, सुवर्णा साखरे, सोनल जाजू ,रत्नमाला मचाले, अनिता पाटील, उषा छत्रे, लक्ष्मी आचलेर, श्रद्धा मंगरुळे, मिलन तोरस्कर, शीतल जिरोळे, अश्विनी बोराळकर, रोहिणी फुलारी, आशा भगरे,वेदिका हार्डिकर, प्रियंका किरनळी, माधवी धर्मसाले, डॉ.दीपमाला अडवितोट, वर्षा शिंदे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.