ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये राज्य सरकार विरोधात महिलांचे आंदोलन,भाजप महिला आघाडीने केले नेतृत्व

 

अक्कलकोट,दि.१२: अक्कलकोट येथे सोमवारी भाजप महिला मोर्चाच्यावतीने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आंदोलन छेडून नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रात तीन पक्षाचे तसेच मोठा विकास करण्याचे ठरवून एकत्र आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मूळ विषय बाजूला राहून महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरुच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही काही केल्या थांबेना. भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांना सदर घटनांबद्दल निवेदन पाठविले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही. यावरुन हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही. ही सर्व वस्तुस्थिती असल्यामुळे भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे महाराष्ट्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले होते.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी,पक्षनेते महेश हिंडोळे, महिला आघाडीच्या सुरेखा होळीकट्टी,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,शिवशरण जोजन,बसवंत कलशेट्टी,रमेश कापसे, विक्रम शिंदे,शिवशंकर स्वामी,
दीपक जरीपटके यांच्यासह जि. प सदस्य मंगल कल्याणशेट्टी,अरुणा पवार,अंबुबाई कामनूरकर , सोनाली शिंदे सोनाली,भागुबाई कुंभार ,पूजा राठोड,विजयालक्ष्मी बुक्कानुरे,दिपाली आळगी, चंद्रकला कलशेट्टी, प्रभाकर मजगे, राजशेखर मसुती, गुंडप्पा पोमाजी, राजेंद्र बंदिछोडे, विश्वनाथ इटेनवरु, दयानंद बमनळ्ळी, गेनसिध्द पाटील, शिवपुत्र बुक्कनुरे, श्रीशैल नंदर्गी, संतोष आळगी, नागनाथ कुंभार, बंटी राठोड, विक्रम शिंदे, छोटू पवार, शिवरुद्र भत्ता, लक्ष्मण बुरुड, गिरमलप्पा भरमा, सुनिल गवंडी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!