ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांचे आवाहन, काय आहेत अटी आणि नियम पहा

 

अक्कलकोट, दि.११ : छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारीला साजरा केला जातो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करावी,असे आवाहन पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी केले आहे.तसे आदेश गुरुवारी गृह विभागाने काढले आहेत.या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे.या प्रामुख्याने गड-किल्ल्यांवर जाऊन जयंती साजरी न करता घरी बसूनच साजरी करावी,सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये,प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे.महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे,केवळ दहा व्यक्‍तींच्या उपस्थितीतच जयंती साजरी करावी,आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास असेल परवानगी, परंतु यासाठी नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.
यात आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यास मात्र परवानगी देण्यात आली आहे.त्यावेळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता अशा नियमांचे पालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तर यावेळी कोरोना,
मलेरिया, डेंगी यासह अन्य आजारांविषयी जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दहा व्यक्‍तींशिवाय अधिक व्यक्‍तींनी एकत्रित येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.याचे पालन अक्कलकोट तालुक्यातील मंडळांनी देखील करावे,असे आवाहन पुजारी यांनी
केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!