अक्कलकोट,दि.३१ : शासनाच्यावतीने राबविण्यात
येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ रविवारी अक्कलकोट तालुक्यात करण्यात आला.शहर आणि
तालुक्यात मिळून ३२ हजार ९६४ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला.
पाच वर्षांच्या आतील बालकांसाठी ही मोहीम राबविण्यात आली.अक्कलकोट शहरामध्ये २५ केंद्र होते.
त्यात ५ हजार १३१ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.याचा शुभारंभ अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समिती सदस्य अविनाश मडीखांबे आणि ग्रामीणचे
वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. श्री स्वामी समर्थ मंदिरात वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते तर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थेचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
दिवसभर अक्कलकोट शहरात ९१ टक्के लसीकरण झाल्याची माहिती डॉ.अशोक राठोड यांनी दिली.तर ग्रामीणमध्ये ही मोहीम २६३ केंद्रावर राबविण्यात आली.२८ हजार ५९८ पैकी २७ हजार ८३३ बालकांना डोस दिला गेला.ग्रामीण भागात ९७ टक्के लसीकरण झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांनी दिली.अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बागडे यांनी मैंदर्गी आणि दुधनी केंद्राला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.करजखेडे यांनी नागणसूर,अक्कलकोट स्टेशन, समर्थ नगर,डिग्गेवाडी, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली.त्यांच्या हस्ते जेऊरमध्ये शुभारंभ करण्यात आला.
स्वामी समर्थ मंदिरात झालेल्या कार्यक्रमास ग्रामीण अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अंजली खरात, व्ही.कोटनूर, सविता बिराजदार, विजयालक्ष्मी लोहार, पल्लवी जाधव, सुप्रिया नाईक, रेश्मा लोणारे यांचे सहकार्य लाभले तर लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, सागर गोंडाळ, रविराव महिंद्रकर, संतोष जमगे, गिरीश पवार, प्रसाद सोनार उपस्थित होते.या उपक्रमासाठी तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व एन.सी.सीच्या विद्यार्थ्यांनीही परिश्रम घेतले.