ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात रब्बी पेरणीला प्रारंभ; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर आर्थिक टंचाई

अक्कलकोट, दि.३ : मागच्या आठ महिन्यात झालेली कोरोनामुळे वाताहत आणि आठ दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.अशाही परिस्थितीत राम भरवशावर रब्बी पेरणीला सुरूवात केली आहे.

वास्तविक पाहता पूर्वीच्या हंगामातील पिके परतीच्या पावसाने उद्धवस्त झाली आहे. अचानक निर्माण झालेल्या अस्मानी संकटा मुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचा कंबरडा मोडले आहे . तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे राजकीय नेत्यांची पाहणी दौरा होऊन पंधरा दिवस होऊन गेले अजूनही शेतकर्‍यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. इकडे शेतकरी मात्र रब्बी हंगामाच्या तोंडावर नुकसान भरपाई मिळेल म्हणून आशा करुन बसला आहे.परंतु अजून तरी सरकारकडून शेतकर्‍यांच्या पदरात कुठलीच मदत मिळाली नाही.अशा संकटातच रब्बी हंगाम सुरू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कारण पुरात बहुसंख्य शेतकर्‍यांचे बैल बारदाना,घरा समोरील जनावरे वाहून गेल्याने रब्बी पेरणी करायचे कसा ? हा मोठा प्रश्न पुरग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच मार्ग काढत शेतकरी काळ्या आईची ओटी भरावी म्हणून वापसा मिळताच रब्बी पेरणीला सुरुवात केली आहे.एकीकडे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे अतिवृष्टीचा फटका सहन करत तालुक्यातील बळीराजा रब्बी पेरणीसाठी तिपणीवर हात ठेवताना दिसत आहे. सध्या खरीप पीक पाणी लागून वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.सरकार कडून नुकसान भरपाई मिळाला नाही. त्यातच आता पाऊस बंद झाल्याने वापसा येऊन काही भागात रब्बी पेरणीला सुरुवात झाली आहे. तोंडावर दिवाळी सण आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सावकारी कर्ज काढून रब्बी पेरणी व दिवाळी सण साजरा करण्याशिवाय पर्याय उरला नाही. बहुसंख्य नदीकाठच्या भागातील शेतकर्‍यांना पुराचा फटका बसल्याने त्यांचा संसार उघड्यावरच पडला आहे.त्यासाठी घर थाटाव तर हातात पैसा नाही.खायला घरात धान्य नाही. अशा परस्थितीत ही शेतकरी रब्बी हंगामाला सामोरे जाताना दिसत आहेत. दिवाळी पूर्वीच अस्मानी संकटाचा जबरदस्त फटका या शेतकरी वर्गांना बसल्याने या पुरग्रस्त नागरिकांची यंदाची दिवाळी ही अंधारात जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!