ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात ६२ ग्रामपंचायतीसाठी चौदाशे कर्मचारी

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यात उद्या शुक्रवारी ६२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत

आहे.या पार्श्वभूमीवर गावोगावी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी चौदाशे कर्मचारी  नियुक्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली.७२ गावांसाठी एकूण ६३४ जागा होत्या त्यापैकी ९ गावे बिनविरोध झाली आहेत तर एका गावची फेरनिवडणूक लागणार आहे.त्यामुळे ४४७ जागांसाठी ९८० उमेदवार आपले

भवितव्य आजमावत आहेत.यासाठी पीओ-२३५,पीआरओ-२३५,एफपीओ-२३५,ओपीओ-२३५,ओपीओ दोन–२३५ ,शिपाई – २३५ अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेत  एकूण १ हजार ४१० कर्मचारी कार्यरत आहेत. एकूण २१३ मतदान केंद्रावर १ लाख १३ हजार ३२८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ५९ हजार ४२० पुरुष मतदार तर, ५३ हजार ९०१ स्त्री मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.यासाठी आज तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यामध्ये मतदान पेट्या, निवडणूकीचे साहित्य, निवडणूक अधिकारी व त्या करिता लागणारे कर्मचारी उपस्थित राहून मत पेट्या, चिन्हे ,मशीन याची खात्री करून घेताना कर्मचारी दिसत होते.निवडणूक कामाकरिता तालुका  महसूल प्रशासनाच्या वतीने आजपर्यंत विविध विषयावर प्रशिक्षण तसेच मिटिंग आयोजित करुन सर्व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा किंवा अनुपस्थितीत न राहणेबाबत तालुका प्रशासनाच्यावतीने निर्देश दिले आहेत.त्यानुसार उद्या मतदान देखील व्यवस्थितपणे पार पडेल,असा विश्वास मरोड यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!