अक्कलकोट,दि.२२ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अक्कलकोट शहर व तालुका यांच्या वतीने पंढरपूर येथे केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंञी रामदास आठवले हे परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आले असता त्यांना प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे व अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष विजयकुमार पोतेनवरु,युवक आघाडी तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव,शुभम मडिखांबे, उपस्थित होते.
आठवले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतीच्या पावसाने सोलापूर जिल्हा व अक्कलकोट तालुक्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभे असलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेले पिक वाया गेल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तरी शासनाने त्वरित कोणत्याही प्रकारची विलंब न करता तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच हेक्टरी ५०००० रु. अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. आणि पुरामुळे अनेक घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर आली आहेत. पशुधनांचे देखील जिवितहानी झाली आहे तरी या सर्वाना सरसकट पंचनामे न करता शासकीय मदत मिळवून द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान अक्कलकोट तालुक्यात झाले आहे. तरी केंद्र सरकार व राज्यसरकारने त्वरीत पुरग्रस्त पिढीतांना तात्काळ शासकीय मदत मिळवून द्यावी जेणेकरून उघड्यावर पडलेल्या संसाराला पुन्हा एकदा जिवन जगण्याची उभारी मिळेल. सदर निवेदन दिल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंञी रामदास आठवले यांनी अविनाश मडिखांबे यांना आश्वासन दिले की मी लवकरात लवकर मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्याशी बोलणी करुन पूरग्रस्तांसाठी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी भाग पाडू असे सांगितले..
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.