अक्कलकोट – सोलापूर रस्त्यावरील टोल बसविण्याची घाई,नियमानुसार करा …अन्यथा खळ…. खट्याक ! : अविनाश मडिखांबे
अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट ते सोलापूर रस्त्याचे काम प्रगतीपथावर, ही बाब समाधानाची बाब व स्वागत. या प्रकल्पाची अनेक कामे ही अद्यापही व्हायची बाकी आहेत, यास कालावधी लागणार असून मात्र वळसंगनजीक टोल बसविण्याची लगीनघाई ठेकेदार करीत आहे; संपूर्ण काम पूर्ण व्हावे मगच नियमानुसार निविदेत अग्रशीत नुसार सुरु करावेत अन्यथा खळ…. खट्याक! चा इशारा आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिला आहे.
ते अक्कलकोट ते सोलापूर रस्त्याच्या वळसंगनजीक उभारण्यात येत असलेल्या टोलच्या पार्श्वभूमीवर मडिखांबे हे बोलत होते.
अविनाश मडिखांबे पुढे बोलताना म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग होणे ही काळाची गरज असल्याने केंद्र सरकारने सदरचा रस्ता हाती घेण्यात आला. सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. अजून रस्त्याची कामे व्हायची बाकी आहेत. याकरिता वर्ष-दोन वर्षाचा कालावधी जाईल. मात्र टोल उभारण्याची लगीनघाई ठेकेदाराने सुरु केलेली आहे.
अर्धवट रस्त्याचे काम ठेवून टोल वसुली सुरु केल्यास आरपीआय (आठवले गट) चे आम्ही सर्वजण टोल नाक्यावर खळ… खट्याक! आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मडिखांबे यांनी दिला आहे. याबाबत प्रकल्प संचालकांनी देखील खुलासा करावेत अशी मागणी मडिखांबे यांनी केली आहे.