ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अखेर लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद: घरातून आढळल्या तलवारी

नवी दिल्ली: दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 जानेवारीला हिंसक वळण लागले होते. प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता. आंदोलनातील काही आंदोलकर्त्यांनी लाल किल्ल्यावर जाऊन पोलिसांना मारहाण करण्याबरोबरच धार्मिक ध्वज फडकावला होता. दरम्यान लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत.

महिंदर सिंग उर्फ मोनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

यापूर्वी  अभिनेता  दीप सिद्धू याला पोलिसांनी अटक केलेली आहे.

मोनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. हिंसाचाराच्या घटनेपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. ३० वर्षीय मोनी दिल्लीतीलच स्वरूप नगर येथील रहिवासी असून, त्याला पितम पुरा बस स्थानकाजवळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!