ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अखेर सरकार शेतकऱ्यांशी करणार आज चर्चा

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात 6 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकराने अखेर आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे.  याअगोदर सरकारकडून ३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असं जाहीर करण्यात आलं होतं.

परंतु, दिल्लीतील कडाक्याची थंडी आणि कोविड संक्रमण पाहता ही बैठक ३ डिसेंबरऐवजी आजच (मंगळवारी) होईल, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केलंय.

शेतकरी संघटनांच्या नेत्यांना दिल्लीतील विज्ञान भवनात दुपारी ३.०० वाजता चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलंय. १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सहभागी झालेले शेतकरी नेते आज होणाऱ्या दुसऱ्या बैठकीतही सहभागी होणार आहेत.

सरकारच्यावतीनं या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासहीत आणखीही काही मंत्री उपस्थित राहू शकतात. याशिवाय कृषी मंत्रालयाचे वरीष्ठ अधिकारीही उपस्थित राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!