ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अरारारारा… खतरनाकssss पुन्हा होणे नाही,संगीतकार नरेंद्र भिडे माझा हक्काचा संगीतकार गेला ; प्रविण तरडे

पुणे – सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे आज (१० डिसेंबर) रोजी पहाटे, हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते.  दरम्यान, नरेंद्र भिडे यांच्या निधनानंतर अभिनेता प्रवीण तरडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

 

प्रविण तरडे यांनी अरारारारा… खतरनाकssss पुन्हा होणे नाही, या संगीताची चाल ज्यांना तीन वर्षांपूर्वी सूचली तो माझा हक्काचा संगीतकार गेला, अशा शब्दात दु:ख व्यक्त केलंय. संगीतकार नरेंद्र भिडे यांनी ज्यादिवशी हे संगीत कंपोज केलं, त्या दिवसाचा व्हिडिओ शेअर करत त्यांना फेसबुकवरुन आदरांजली वाहिली आहे.

 

नरेंद्र भिडे यांची सांगीतिक कारकीर्द  चित्रपट

सरसेनापती हंबीरराव (आगामी), मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट , अनुमती , दिल ए नादान (बायोस्कोप) , देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी, मालक, मसाला, समुद्र, चाँद फिर निकला (हिन्दी) याशिवाय श्वास, सरीवर सरी, माती माय सह अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत.

भिडे यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!