ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अलिबाबा समुहाचे अध्यक्ष जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता?

पेइचिंग : चिनी अब्जाधीश आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्यांना ई कॉमर्सच्या जगताचे बादशाहा म्हटलं जातं ते अलिबाबा ग्रुपचे मालक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. जॅक मा चीनचे राष्ट्रानध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या वादानंतर दोन महिन्यांपासून दिसलेले नाहीत. ‘आफ्रिका बिझनेस हिरोज’ या त्यांच्या स्वतःच्याच टॅलेंट शोमध्येही ते उपस्थित नव्हते. तेव्हापासून ते बेपत्ता असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

काही दिवसांपूर्वी जॅक मा यांनी व्यवसायात नवनवीन संकल्पना आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना लोकांना त्यांचं स्वातंत्र द्यावं आणि त्यांच्यावर सरकारी दडपण आणू नये, असं म्हटलं होत. तसेच त्यांनी जागतिक बँकिंगच्या नियमांना ‘वृद्धांचा अड्डा’ म्हणत खोचक टीकाही केली होती. या भाषणानंतर त्यांना चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. जॅक मा यांनी केलेली टीका कम्युनिस्ट पक्षाने स्वतः ला लावून घेतली आणि हा वाद वाढत गेला.

जॅक मा यांना शेवटचं नोव्हेंबरमध्ये पाहिलं गेलं आहे.  ते ‘अफ्रिका बिझिनेस हीरोज’ या टीव्ही कार्यक्रमांत दिसले हाते. त्यानंतर रहस्यमयरित्या गायब झाले आहेत. गायब होण्यापूर्वी ते सतत त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काहीना काही ट्वीट करत असायचे. त्यांचं मतं प्रदर्शित करायचे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांचं एकही ट्वीट समोर आलं नाही. त्यांचं शेवटचं ट्वीट 10 ऑक्टोबर रोजी आलं आहे. तेव्हापासून ते रहस्यमयरित्या गायब झाले आहेत. चिनी माध्यमं स्वतंत्र नाहीत. त्यामुळे अर्थातच चीनमध्ये मा यांच्या गायब होण्यासंदर्भात बातम्या आलेल्या नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!