नवी दिल्ली । जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४५ डॉलरपुढे गेल्याने पेट्रोलियम कंपन्यांवरील तेल आयातीमचा खर्च वाढला आहे. परिणामी हा भार त्यांनी ग्राहकांवर लादण्यास सुरुवात केली आहे. आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल झाला नाही. मात्र मागील १५ दिवसांत झालेल्या दरवाढीने पेट्रोलचा भाव २५ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर गेला आहे.
कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. यात पेट्रोल १.२८ रुपये आणि डिझेल १.९६ रुपयांनी महागले. दिल्लीत सोमवारी पेट्रोल दर ८२.३४ रुपये होता. जो १९ ऑक्टोबर २०१८ नंतरचा सर्वाधिक दर आहे. तर डिझेल ७२.४२ रुपये होते. १६ सप्टेंबरनंतरचा डिझेलचा उच्चांकी दर आहे. या 15 आठवड्यांत पेट्रोलवरील शुल्क 11.77 रुपयांनी तर डिझेलवर 13.47 रुपयांनी वाढले आहे.
असे आहे मोठ्या शहरातील दर
दिल्ली पेट्रोल 82.34 रुपये आणि डिझेल 72.42 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 89.02 रुपये आणि डिझेल 78.97 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकाता पेट्रोल 83.87 रुपये तर डिझेल 75.99 रुपये प्रतिलिटर आहे.
चेन्नई पेट्रोल 85.31 रुपये आणि डिझेल 77.44 रुपये प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 82.62 रुपये तर डिझेल 72.83 रुपये प्रतिलिटर आहे.
लखनऊ पेट्रोल 82.54 रुपये आणि डिझेल 72.75 रुपये प्रतिलिटर आहे.
पटना पेट्रोल 84.93 रुपये आणि डिझेल 77.80 रुपये प्रतिलिटर आहे.
चंडीगड पेट्रोल 79.28 रुपये आणि डिझेल 72.17 रुपये प्रतिलिटर आहे.