ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजपर्यंत झाले नाही तसे आंदोलन करणार: राज्यात भाजपचे २७८ ठिकाणी जेलभरो

मुंबई: कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला वीजबिलात सवलत देण्याऐवजी राज्य सरकारने वीजबिल न भरल्यास पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. वीजपुरवठा खंडित केले गेल्याने राज्य सरकारवर टीका होत आहे. विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राज्यभरात भाजपचे आंदोलन झाले असून पुन्हा शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ, २४ फेब्रवारी रोजी भाजपाकडून राज्यभरात २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन केले जाणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत असे आंदोलन झाले नसेल असे आंदोलन करणार असल्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

‘राज्यात शेतकऱ्यांची व घरगुती वीज तोडणे आणि ते देखील दमदाटी करून, पोलिसांच्या बळाचा वापर करून. महाराष्ट्रात यापूर्वी या पद्धतीने कधीही या मोगलशाही पद्धतीने कारभार केला गेला नाही, मात्र असं काम मागील आठ ते पंधरा दिवसांपासून वीज खात्याकडून सुरू झाले आहे असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यात भाजपचे सरकार असतांना पाच वर्षे ४५ लाख शेतकऱ्यांचे २८ हजार कोटी थकीत झाल्यावरही वीजपुरवठा खंडित केला गेला नाही. पण या सरकराने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे सुरु केले आहे. राज्यातील तीन कोटी लोकांना अंधारात आणण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. या सरकारला आज आम्ही शेवटची विनंती करतो आहे’ असा इशआरा देखील बावनकुळे यावेळी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!