ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता अवघ्या ३० मिनिटांत LPG सिलेंडर घरपोच मिळणार ; १ फेब्रुवारीपासून ‘ही’ कंपनी सुविधा देणार

नवी दिल्ली – सर्वसाधारणपणे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर सिलेंडर येण्यासाठी किमान दोन ते चार दिवस वाट पाहावी लागते. मात्र आता गॅस बुकिंग केल्यानंतर सिलेंडरसाठी दोन-चार दिवस वाट पाहावी लागणार नाही. तर बुकिंगनंतर अवघ्या ३०-४० मिनिटांमध्ये सिलेंडर तुमच्या घरी येणार आहे.

सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल (IOC) ने एलपीजी तात्कळ सेवा (Tatkal LPG Seva) चालू करण्याची योजना आखली आहे. ज्याद्वारे आपल्याला अवघ्या अर्ध्या तासात सिलेंडर मिळू शकतो. म्हणजेच आता आपण ज्या दिवशी सिलेंडरचे बुकिंग कराल त्यादिवशीचा सिलेंडर मिळवू शकाल. IOC सुरुवातीला ही सुविधा प्रत्येक राज्याच्या 1 शहरात ही सेवा सुरू करणार आहे. येथे तात्कळ सेवा दिली जाईल.

30 ते 45 मिनिटांत आपल्या घरी पोहोचणार सिलेंडर

Business Standard च्या बातमी नुसार, IOC प्रत्येक राज्यातील एक शहर किंवा एक जिल्हा निवडेल आणि आधी याठिकाणी ही सेवा सुरू करेल. या सेवेच्या अंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांकडून 30 ते 45 मिनिटांत सिलेंडर पोहोचवतील. तेल कंपन्यांनी सांगितले की, यावर काम चालू आहे. लवकरच हि सुविधा फायनल केली जाईल.

1 फेब्रुवारी पासून सुरु होईल ही सेवा

IOC ने म्हणाली, याद्वारे कंपनीची भूमिका प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा वेगळी होईल. कंपनीची ही सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू केली जाऊ शकते असे अधिकारी म्हणाले. सर्व लोकं यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

IOC रात्री 14 कोटी ग्राहक

IOC चे ईण्डेन या ब्रँड नावाने आपल्या ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध करून देते. सध्याच्या काळात देशभरात 28 कोटी एलपीजी ग्राहकांची नोंद आहे, ज्यांपैकी 14 कोटी ईण्डेन गॅसची सेवा घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!