ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते ‘रेनॉ कायगर’ या कारचे अनावरण,सर्व नव्या ‘रेनो काइगर’ आता INR 5.45 लाखांपासून उपलब्ध; आजपासून नोंदणी सुरू

 

सोलापूर (प्रतिनिधी) रेनो कंपनी कडून नुकतेच लॉन्च केलेल्या रेनो कायगर ही गाडी आता सोलापुरातील होटगी रोड वरील गुरुकृपा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, सोलापूर या दालनात दाखल झाली आहे.सोलापूरात ‘रेनो कायगर’ कारचे अनावरण आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते,अँड.मिलिंद थोबडे,दिलीप कोल्हे,कंपनीचे एम.डी अनिल झंवर,डायरेक्टर प्रतिक झंवर ग्रुप सी.ई.ओ के.एस फ्रान्सेस यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले की,गाडी विक्रीची सुरुवात चांगली झाली आहे.गाडीची किंमतही सोलापूरकराना परवडणारी आहे.गाडीची विक्री चांगली झाल्यास सोलापूरचे नाव देशात आणखी मोठे होणार आहे.तसेच सोलापूरातही कार प्रेमिंची संख्या लक्षणिय आहे.या रेनो कायगर या कारलाही सोलापूरकर चांगला प्रतिसाद देतील,असे आ.देशमुख यांनी कारच्या लाँचिंग प्रसंगी बोलताना म्हणाले.तसेच या कार्यक्रमाप्रसंगी एडवोकेट मिलिंद थोबडे व दिलीप भाऊ कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.
गुरुकृपा मोटार्स गेली सात वर्षापासून रेनॉल्ट कंपनीचे अधिकृत डिलर म्हणून कार्यरत आहे.सोलापूर,पंढरपूर,बीड व नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुसज्ज शोरूम आणि वर्कशॉप या माध्यमातून सर्व ग्राहकांना तत्पर सेवा दिली जात आहे.आज पर्यंत १०००० हून अधिक ग्राहकांच्या सहकाऱ्यांनी गुरुकृपा मोटर्स यांची यशस्वी वाटचाल झाली आहे. नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्ध असलेल्या रेनोने आज त्यांच्या संपूर्ण नव्या स्वरूपातील काइगरची किंमत भारतीय मूल्यात INR ५.४५ लाख (एक्स-शोरूम, भारतात सर्वत्र) रुपये असल्याचे जाहीर केले.या अद्वितीय किंमतीमुळे, रेनो काइगर आता बी-एसयुव्ही विभागातील मूलभूत चैतन्य पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.फ्रान्स आणि भारताच्या संयुक्त सहकार्याने रेनो काइगरची रचना करण्यात आली आहे.
जागतिक स्तरावर जाण्यापूर्वी,प्रथम भारतीय ग्राहकांसाठी भारतातच तिचा विकास आणि निर्मिती करण्यात आली आहे.रेनो काइगरने स्वत:ला मनमोहक,स्मार्ट आणि स्पोर्टी बी-एसयुव्हीच्या स्वरूपात प्रस्थापित केले आहे.या मनमोहक डिझाईनला स्पोर्टी आणि दणकट घटकांची साथ लाभल्याने रेनो काइगर ही एक खरीखुरी एसयुव्ही झाली आहे.रेनो काइगरच्या स्मार्ट केबिन मध्ये तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि खोलीचा आभास यांचा सुरेख मेळ घातला गेला आहे.रेनो काइगर नवीन टर्बोचार्ज १.० लिटर पेट्रोल इंजिनने सक्षम असून ती अधिक कामगिरी प्रधान आणि चालक अनुभव देणारी आहे. तिचे सर्वोच्च कामगिरीसंपन्न,आधुनिक आणि सक्षम इंजिन स्पोर्टी ड्राईव्हची खातरजमा करेल या वाहनात मल्टी सेन्स ड्राईव्ह मोडस उपलब्ध आहेत.जी ग्राहकांच्या ड्रायव्हिंग प्राधान्यानुसार साजेशी लवचिकता प्रदान करते.तरी सर्व गुरुकृपा मोटार शोरूम मधून सर्व ग्राहकांनी आपल्या नवीन कार ‘कायगर’ची टेस्ट ड्राइव्ह घ्यावी व आपली आवडती कार लवकरात लवकर बुक करावी असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले.यावेळी सेल्स हेड दिनेश सकट,सेल्स मॅनेजर रेबिका बिटे,मोसिन शेख,ऐश्वर्या मानधनिया आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्वेता झवर यांनी केले तर आभार प्रतीक झवर यांनी मानले.

सोलापूरात ६ वर्षापासून रेनोची सेवा

अनिल झंवर म्हणाले, सोलापूरात मागील सहा वर्षांपासून रेनो आपली सेवा देत आहे.यामुळे प्रत्येक ग्राहक सेवेबद्दल समाधानी आहे.कायगर कारमध्ये अनेक नवीन फिचर आले आहेत.पण किमंत मात्र परवडणारी आहे.गाडी लाँचिंग पुर्वीच ३५ गाड्यांचे बुकिंग झाले आहेत.असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!