ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत भाषा- प्रांतापलीकडे पोहचविले

 

मुंबई, दि.२५ :- आपल्या नाद-मधूर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलिकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. त्यांना काळाने आपल्यातून ओढून नेले आहे.अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेले संगीताचे वरदान ‘एसपीं’नी आपल्या सुरांनी आणखी झळाळून टाकले. त्यांनी सोळा भाषांतून हजारो गाणी गायली, तीही विविध प्रकारची. यातून सुरांवर हुकूमत गाजविणाऱ्या ‘एसपीं’नी आपला एक रसिक वर्ग निर्माण केला. संगीत हे भाषा आणि प्रांत या पलिकडे असते हे सिद्ध करत ‘एसपीं’नी आपल्या नाद-मधूर सुरांनी भारतासह जगातील रसिकांना मोहवून टाकले. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती. अगदी अलीकडे त्यांनी मराठीतही एक गाणे आपल्या मनस्वी शैलीत गायिले होते. कोरोनाशी झुंज देत असणाऱ्या या सुरांच्या दूनियेतील अवलियाला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्यांच्या आवाजाची जादू मागे राहील, ते त्या अर्थाने अजरामर आहेत. पण एक मनस्वी कलाकार आपल्यातून निघून जाणे दुःखद आहे. ज्येष्ठ गायक एस.पी.सुब्रमण्यम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
000

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!