ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऑस्ट्रेलियावरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना 7-11 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये (SCG) खेळला जाणार आहे. या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

या संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रोहीत शर्माचे संघात पुनरागमन झाले असून त्यासाठी मयंक अगरवालला डच्चू देण्यात आला आहे. तर दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे. नवदीप सैनीची हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे. सध्या मालिकेत टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया एक एक सामना जिंकून बरोबरीवर आहेत

दरम्यान, मयांक अग्रवालला मागील आठ कसोटी डावांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याला सिडनी कसोटीसाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार हे जवळपास निश्चित झाले होते.  मयांक अग्रवालऐवजी टीम इंडियामध्ये रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. तो शुभमन गिलसोबत सलामीला फलंदाजीला येईल. लोकेश राहुलनेही दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे हनुमा विहारीचे मधल्या फळीतील स्थान पक्के आहे. भारतीय संघ पाच गोलंदाजांसह पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्यामुळे हनुमा विहारीला आपली चमक दाखवावीच लागणार आहे.

असा आहे भारतीय संघ –

अजिंक्य राहणे (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी (पदार्पण)

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!