–अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. गोलंदाजांनी भारतीय संघाला महत्त्वाची आघाडी मिळून दिली.
अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. गोलंदाजांनी भारतीय संघाला महत्त्वाची आघाडी मिळून दिली.
भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९१ धावांवर गुंडाळले आणि ५३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्ठात आणला. पण त्यानंतर जसप्रीत बुमराह, अश्विन आणि उमेश यादव यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गोलंदाजीवर नाचवले.
दुसऱ्या दिवसअखेर मयंक अग्रवाल 5 तर नाइट वाॅचमन जसप्रीत बुमराह शून्यावर खेळत आहे. पृथ्वी शाॅ दुसऱ्या डावातही फेल ठरला. त्याला 4 धावांवर कमिन्सने त्रिफळाचित केले.
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजीत टीम पेनने सर्वाधिक 73 (नाबाद) तर मार्नस लाबुशेनने 47 धावा केल्या. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजांचा भारतीय गोलंदाजा समोर निभाव लागला नाही. भारताकडून पहिल्या डावात गोलंदाजीत आश्विनने सर्वाधिक 4, उमेश यादवने 3 तर जसप्रित बुमराहने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – #india भारत दुसरा डाव – 1 बाद 9 (6 षटक).( पृथ्वी शाॅ 4, मयंक अग्रवाल खेळत आहे 5, जसप्रित बुमराह खेळत आहे 0, कमिन्स 1/06(3) ). #Australia ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्वबाद 191(72.1) – टी. पेन 73*(99), मार्नस लाबुशेन 47(119); आर आश्विन 4/55(18), उमेश यादव 3/40(16.1), जसप्रित बुमराह 2/52(21) आणि #India : भारत पहिला डाव : सर्वबाद 244(93.1) – विराट कोहली 74(180), चेतेश्वर पूजारा 43(160), अंजिक्य रहाणे 42(92) ; मिशेल स्टार्क 4/53(21), पी.कमिन्स 3/48(21.1), नाथन लायन 1/68(21), हेझलवूड 1/47(20)