दिल्ली,दि.२४ : देशाच्या विविध भागात पुरामुळे अनेक ठिकाणी कांदा पिके उध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कांदा दर वाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले आहेत.
याआधी सरकारने सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.आता पुन्हा हे निर्बंध घातले आहेत. सरकारच्या निर्णयानुसार घाऊक व्यापाऱ्यांना 25 मेट्रिक टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना 2 टन कांदा आपल्याकडे साठवून ठेवता येणार आहे.
हे निर्बंध येत्या 31 डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहेत.