मुंबई:अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेत केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदाच दणदणीत आणि खणखणीत मुलाखत दिली. कितीही ट्रोल करा. मी मराठी मुलगी आहे. मागे हटणार नाही. माझं काम करतच राहणार, असा इशारा देतानाच ट्रोलरमुळे देशात विद्वेषाचं वातावरण निर्माण झालं आहे, असं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदाच दणदणीत आणि खणखणीत मुलाखत दिली. यावेळी त्यांनी धर्मनिरपेक्षता, हिंदुत्व, काँग्रेस आणि भाजप आदी सर्व मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी ट्रोलरवरही टीका केली. ट्रोलरमुळे देशात विद्वेषाचं वातावरण निर्माण झालं आहे. अत्यंत हीनपातळीवर ट्रोलिंग केल्या जातं. मला पुन्हा ट्रोल केल्या जात आहे. पण ट्रोल केल्यामुळे मी योग्य रस्त्यावरून जात असल्याचं माझ्या लक्षात येतंय. मला कितीही ट्रोल केलं तरी मी मागे हटणार नाही. मी मराठी मुलगी आहे. मराठी पाऊल पुढे पडतच राहणार, असा इशारा त्यांनी भाजपच्या ट्रोलरला दिला.