ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केंद्राचा मोठा निर्णय ; ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द

नवी दिल्ली : ब्रिटनमधील कोरोना स्थिती लक्षात घेत ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे २२ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केलाय.

आज रात्री 12 वाजल्यापासून ही सेवा बंद होणार आहे. त्याआधी ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारत सरकारने तसं ट्विट करून ही माहिती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्रिटनकडे जाणारी आणि ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद करण्याची मागणी केली होती. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना फैलावत असल्याने भारतातही त्याचा फैलाव होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय घ्यावा, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं होतं.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी ब्रिटनला जाणारी विमानं रद्द केली आहेत. या नव्या कोरोना व्हायरसमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही आज आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी

दरम्यान, कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढल्यामुळे जगातील सर्व देश सतर्क झाले आहेत. युरोपमधील बहुतांश देशांनी ब्रिटनमधून येणारी सर्व विमान उड्डाणं रद्द केली आहेत. तसेच, जर्मनीसुद्धा ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. नेदरलँडने डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रिटनमधील विमानाला देशात उतरण्यास बंदी असल्याचे जाही केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!