ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मंजूर

दिल्ली,दि.२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी फेम इंडिया या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मिळणार आहेत. पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतुकीच्या स्वप्नाशी अनुरूप असा हा प्रकल्प असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्यात 240 गाड्या मिळणार आहेत. त्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इंटरसिटी आणि नवी मुंबई महापालिका परिवहन साठी प्रत्येकी 100 बसेस तसेच मुंबईत बेस्टसाठी 40 बसेस उपलब्ध होणार आहेत.मध्यप्रदेश, तमिळनाडू, केरळ, गुजरात आणि पोर्टब्लेअर साठी देखील 241 चार्जिंग स्टेशन मंजूर करण्यात आले आहे.शुक्रवारी,केंद्र सरकारने एकूण 670 इलेक्ट्रिक बसना मंजुरी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!