ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली :  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे दिली.

अहमद पटेल यांना १ ऑक्टोबर रोजी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीजवळच्या गुरगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी प्रकृती खालावल्याने पटेल यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. मात्र, बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पटेल हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ख्याती होती. अहमद पटेल यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!