दिल्ली,दि.१७ : गेल्या काही दिवसांपासून भारताने कोविड-१९ विरुद्ध सुरू केलेल्या लढाईला मोठे यश मिळाले आहे.
देशात उपचार सुरू असलेल्या covid-19 च्या रुग्णांची संख्या १ सप्टेंबर पासूनच्या दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच आठ लाखांच्या खाली आली आहे.गेल्या २४ तासात ७० हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ७ लाख ९५ हजार इतकी झाली आहे. या लढाईत भारताने केलेली ही खूप मोठी कामगिरी म्हणावी लागेल. देशात मृत्यू दरातही सातत्याने घट होत आहे ही बाब देखील समाधानाची म्हणावे लागेल.देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना बाधितांची संख्या ६५ लाख २४ हजारवर पोचली असून बरे झालेले आणि प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्या कोरोना बाधित रुग्ण संख्येतील फरक वाढत चालला आहे. त्याशिवाय देशात सध्या कोरोना आजारातून बरे होण्याचा दरही ८७ पूर्णांक ७८ टक्के झाला आहे.भारताने या लढाईत खूप महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.