ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना लसीबाबत मोठी बातमी…पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली: संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगातील अनेक आरोग्य संस्था प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनासाठी दिवसरात्र एक करत आहेत. काही लसींची चाचणी अखेरच्या टप्प्यात आहे. काही चाचण्यांतून सकारात्मक निकालही हाती आले आहेत. असं असतानाच आता लसीबाबत एक आनंदाची बातमी आहे.

कारण युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होईल.

काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने घोषणा केली होती, की त्यांना लॅबमध्ये COVID-19 अर्थात कोरोनावरील एक अशी लस तयार करण्यात यश आले आहे, जी कोरोनाविरोधात 96% प्रभावी ठरली आहे. जर्मनीची बायोफार्मास्यूटिकल कंपनी बायोएनटेक आणि तिची अमेरिकन सहकारी कंपनी फायझरने युरोपिय संघासमोर कालच लशीच्या रजिस्ट्रेशनसाठी औपचारिक अर्ज केला होता.

MHRA ला UK सरकारनं 1 जानेवारी पूर्वी विशेष नियमांद्वारे लसीला मंजुरी देण्यासाठी अधिकृतरित्या सांगितलं होतं. येत्या काही दिवसांत लसीचा पहिला टप्पा बाजारात येईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. UK सरकारनं लसीचे 40 लाख डोस खरेदी केले आहेत, जे चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात ९५ टक्के प्रभावशाली ठरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!