नवी दिल्ली : देशातील कोरोना लशीसंबंधी महत्त्वाची माहिती देण्यासाठी ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (DCGI) कडून आज रविवारी सकाळी ११.०० वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. अखेर त्याला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, यापूर्वी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञ समितीने सीरम संस्थेच्या कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. या दोन्ही लसी अंतिम मंजुरीसाठी देशाच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल अर्थात डीसीजीआय व्हीजी सोमानी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्यांनी या लसींच्या तातडीच्या वापरास मंजुरी दिली आहे.