कोल्हापूर : राज्यात १६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच चिदानंद सुरवसे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. याठिकाणी शिवानंद बंडे यांच्या गटाचे 9 पैकी 6 जागांवर विजय.