ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रा.पं.निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना चारली पराभवाची धूळ

नांदेड : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना पराभवाची धूळ चारली. सासू-सुनेच्या लढाईत सासूबाई रेखा दादजवार यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सासूबाई अवघ्या चार मतांनी वरचढ ठरल्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या.

सासू-सुनेचं नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असं म्हटलं जातं. विळा-भोपळ्याप्रमाणे असलेल्या या जोडीने खरंतर गेल्या वेळी सरपंचपद निम्मं-निम्मं वाटून घेतलं होतं, मात्र आता सासूबाईंविरोधात सूनबाई निवडणूक मैदानात उतरल्यामुळे ही ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली होती.

दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रेखा दादजवार आणि संगीता दादजवार या सासू-सूनेची जोडीने राजकीय रिंगणात एकमेकींना टफ फाईट दिली. परंतु या लढाईत सासूच प्रभावी असल्याचं पाहायला मिळालं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!