ध्यास विश्वसार्ह बातमीचा

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; जाणून घ्या नवा दर

नवी दिल्ली –केंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत होते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असून, त्यामागील अनुदान देखील बदल होते.. या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तेल कंपन्यांनी एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केलेले नाही. सध्या मुंबईत गॅस सिलेंडर दर ५९४  (14.2 kilograms) आहे.  मुंबईसह अन्य शहरांमध्ये देखील किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.   परंतु, १९ किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरमध्ये ५५ रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे.

पेट्रोलियम व गॅस मंत्रालायाकडून येणाऱ्या माहितीनुसार गॅस कंपन्यांकडून दरमहा एलपीजीच्या (स्वयंपाकाचा गॅस) किंमतीची समीक्षा केली जाते आणि प्रत्यक महिन्याच्या पहिल्या तारखेला रिफिल सिलिंडरचे दर ठरवले जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!