जागतिक दर्जाची उत्पादने होण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे यावे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
दिल्ली,दि.10 : वस्त्रोद्योग क्षेत्रात जागतिक दर्जाची उत्पादने तयार होण्यासाठी या क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे
यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये वस्त्रोद्योग हा एक भाग महत्त्वाचा असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात आयसीसीआर अंतर्गत ‘वस्त्रोद्योग परंपरा’ या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनार कार्यक्रमात ते बोलत होते. वस्त्रोद्योग विभागाने देशात कायमच अनेक संधी निर्माण केल्या असून वस्त्रोद्योगामुळे देशात सर्वाधिक रोजगार मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. आपल्या देशात वस्त्रोद्योग क्षेत्रात शिकण्यासारखे खूप आहे त्यामुळे विणकरांनी एक पाऊल पुढे यावे त्याला आपण सहकार्य करू, असे आवाहन देखील पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.