ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जानेवारीत विक्रमी 1.20 लाख कोटीचा जीएसटी जमा

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  निर्माला सीतारामन अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. दरम्यान, बजेट सादर होण्याआधी सरकारसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

जानेवारीमध्ये 1.20 लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला आहे. हा आकडा गुड्स अॅन्ड सर्विसेस टॅक्स म्हणजेच, जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वाधिक आहे. गेल्या महिन्यामध्ये 1.15 लाख कोटी रुपये इतका जीएसटी गोळा झाला होता. तर गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत 10 हजार कोटी रुपयांचा अधिक महसूल गोळा झाला आहे.

अर्थमंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,19,847 कोटी रुपये इतका जीएसटी सरकारी तिजोरीत गोळा झाला आहे. यापैकी CGST 21,923 कोटी रुपये इतका आहे. तर SGST 29,014 कोटी रुपये इतका, तर IGST 60,288 कोटी रुपये इतका आहे. डिसेंबरपासून 21 जानेवारीपर्यंत 90 लाख GSTR-3B रिटर्न दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!