ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी; ऑनलाईन नोंदणी सुरु

 

सोलापूर, दि.२ : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असून 28 डिसेंबर 2020 पासून एनईएमएल (NEML) पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी भास्कर वाडीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या उच्च प्रतिच्या (FAQ) तुरीला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्यात येणार आहे. तूर उत्पादक शेतकऱ्याकडे ऑनलाईन नोंदणीसाठी 7/12 उतारा, (त्यावर तूर पिकांची नोंद असणे आवश्यक आहे), आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स (बॅक अकाऊंट नंबर व आयएफएससी कोड असावा) कागदपत्राची आवश्यकता आहे.

खरेदी केंद्रासमोर दर्शविलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. तूर खरेदीस सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएस आल्यानंतरच तूर स्वच्छ करुन वाळवून उच्च प्रतिच्या दर्जाची तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावी. जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.भास्कर वाडीकर यांनी केले आहे.

तूर खरेदी केंद्राचे ठिकाण व नावे

अक्र

तूर खरेदी संस्थेचे नांव

केंद्राचे ठिकाण

केंद्रास जोडलेले तालुके

1

संत दामाजी शेती व साधन पुरवठा सह.संस्था म.मंगळवेढा

सोलापूर

द.सोलापूर व उ.सोलापूर

2

संत दामाजी शेती व साधन पुरवठा सह.संस्था म.मंगळवेढा

अक्कलकोट

अक्कलकोट

3

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. दुधनी

दुधनी

अक्कलकोट

4

तुळजाभवानी कृषी व साधन पुरवठा सह. संस्था मर्या, उंबरगे, बार्शी

बार्शी

बार्शी

5

कृषी उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडी

कुर्डूवाडी

माढा

6

तालुका खरेदी विक्री संघ, मंगळवेढा

मंगळवेढा

मंगळवेढा व पंढरपूर

7

विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या. मांगी

करमाळा

करमाळा व माळशिरस

8

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.अनगर

अनगर

मोहोळ

9

भाळवणी कृषी फॉर्मर्स प्रोड्युसर कंपनी लि, भाळवणी

मरवडे

मंगळवेढा व सांगोला

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!