ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेची घोषणा ; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली : देशातील  कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र सरकारने दोन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्याने लवकरच सर्वकाही पुन्हा एकदा सुरळीत सुरु होईल असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

 

अशातच जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा 3 जुलैला होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे. जेईई मेन्सच्या वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता जेईई अॅडव्हान्स परीक्षा कधी होणार याबाबत उत्सुकता होती. 75 टक्केची पद्धत यावर्षी हटवली आहे, विद्यार्थ्यांना दिलासा यामुळे मिळणार आहे.

 

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना या घोषणेची प्रतीक्षा होती. जेईई मुख्य परीक्षेच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर, ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’  परीक्षा कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

 

या परीक्षेच्या तारखेची घोषणा करताना पोखरियाल यांनी सांगितले की, आपण अद्याप पूर्णपणे करोनाच्या संकटातून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. याची विद्यार्थ्यांना मदत होईल. आयआयटी खरगपूर या परीक्षेचं आयोजन करणार आहे.

 

याआधी JEE Mains 2021 परिक्षेच्या तारखा मागील महिन्यात जाहीर करण्यात आल्यानंतर आता JEE Advanced 2021 परिक्षेसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ अभ्यासाला मिळावा याचा पूर्ण विचार करून 3 जुलै 2021 ही तारीख ठरवण्यात आल्याचा पोखरियाल यांनी सांगितलं. सीबीएसईसोबतच राज्य मंडळाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षा एप्रिल मे महिन्यात होणार असल्याने या परीक्षेचे वेळापत्रक लक्षात घेऊन 3 जुलै रोजी JEE Advanced 2021 होणार आहे.

 

देशातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced 2021 परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना JEE Mains 2021 परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी 4 सत्रामध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यास सवलत दिली गेली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे 2021 या चार सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार आहे. 16 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2021 दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज या परीक्षेसाठी करता येणार आहे. जेईई मेन्स 2021 परीक्षा पहिल्यांदाच इंग्रजीसोबत मराठीसह 13 मातृभाषेत ही परीक्षा देता येईल

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!