ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेऊरच्या श्री काशीविश्वेश्वरांची यात्रा साधेपणाने साजरी

अक्कलकोट : जेऊर,ता.अक्कलकोट येथील दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणारा ग्रामदैवत श्री काशीविश्वेश्वर रथोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात येऊन यावेळी साधेपणाने साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लाखभर  भाविक दरवर्षी उपस्थिती दर्शवून रथोत्सव अन्य विविध धार्मिक उत्सव दरवर्षी साजरे व्हायचे पण यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान कमिटी व ग्रामस्थ यांच्या एकत्रित संवादातून कुठेही भाविकांची गर्दी न होता व भाविकांना योग्य अंतर ठेवण्यात येत फक्त रथाचे दर्शन घेण्यात आले.यावेळी विविध मानकरी मिरवणुका,छोटा व मोठा रथ मिरवणूक,नंदीध्वज मिरवणूक आदी न करता स्वयंशिस्त पाळत भाविकांची गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

फक्त मंदिर व रथ यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.यात्रा रद्द झाल्याने  भाविकांची गर्दी सुद्धा कमी झालेली होती.रथ हे जागेवरच ठेवून त्याची पूजा व इतर धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले.दरम्यान कोरोना काळात जाणवत असलेल्या रक्त तुटवाड्यावर उपाय म्हणून बसवेश्वर  बहुउद्देशीय सामाजिक संस्था  व मित्र मंडळ जेऊर यांच्या वतीने आयोजित सतत ११ व्या वर्षीच्या रक्तदान शिबिरात यावर्षी १०१ जण योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपली.या कोरोना महामारीने जेऊर येथे मागील नऊ महिन्यापासून दरवर्षी साजरा केले जाणारे अनेक सण व उत्सव रद्द करण्यात आले होते.त्याचप्रमाणे हा उत्सव देखील अगदी साधेपणाने फक्त पूजा विधी करण्यात येऊन साजरा करण्यात आला.यावेळी श्री काशीविश्वेश्वर देवस्थान पंचकमिटी यांनी कोरोना काळात यात्रेचे संयोजन कोरोना काळात कोणतीही अडचण उदभवू नये यासाठी उत्कृष्ट नियोजन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!