अमेरिका,दि.८ : अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत चुरशीच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. जो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष आहेत. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मतमोजणीचा निकाल काही वेळापूर्वी जाहीर करण्यात आला.त्यामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.

जो बायडन यांनी अत्यंत धक्कादायकरित्या ट्रम्प यांचा पराभव केला आहे.बायडन यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ४८ वर्षांपूर्वी झाली होती. १९७२ मध्ये ते पहिल्यांदा अमेरिकेच्या सिनेटमध्ये निवडून गेले होते. त्यावेळी देखील ते सर्वात कमी वयाचे होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाच्या कार्य काळात दोन वेळा उपराष्ट्राध्यक्ष देखील होते. अमेरिकेचे सर्वात प्रभावी उपराष्ट्रपती म्हणून त्यांचा त्यावेळी उल्लेख झाला होता.जो बायडन हे अमेरिका – भारत संबंधाचे खंदे समर्थक आहेत.जो बायडन यांचे भारतीय-अमेरिकन्सबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत.