ध्यास विश्वसार्ह बातमीचा

… तरीपण माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील ; ग्रेटा आक्रमक

मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या २ महिन्यापासून दिल्लीमध्ये  शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या टि्वटनंतर ग्रेट थनबर्गने भारतातील शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे टि्वट केले होते.रिहाना, ग्रेटा थनबर्गच्या टि्वटनंतर देशातील वातावरण तापले आहे. भारताविरोधात प्रचार केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यावर ग्रेटा थनबर्गने प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना ग्रेटाने ट्विट करत म्हंटले आहे की, ‘कोणत्याही धमकीचा काहीही फरक पडणार नाही. माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील,’ असे तिने म्हंटले आहे. तसेच पुढे ती म्हणतीये, ‘भारतातील शेतकरी शांतेत आंदोलन करत आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. कोणताही द्वेष, धमकी माझी मानवी हक्कांबाबतची ही भूमिका बदलू शकत नाही,’ असेही ग्रेटाने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

रिहानाने शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचे लक्ष वेधले आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचे ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असे तिने लिहले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!