मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले असून राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडुन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या हे अक्षरशः धनंजय मुंडेंवर तुटून पडले होते. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच हवा असंही म्हटलं आहे
मात्र किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्यांचे फोन येत असल्याचं त्यांनी पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करून म्हटलंय की, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे ते सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. त्यात महेश गिते, जयकांत राख, अक्षय तिडके, राम डोईफोडे, रमेश नागरगोजे यांचा समावेश आहे.
तसेच रविवारी सकाळी ११.३० वाजता दोनदा धमकीचे फोन आले, सर्व ६ बुलेट्स तुझ्या डोक्यात घालणार, गेल्या २ दिवसांपासून धमकीचे फोन सुरूच आहे. याबाबत मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना किरीट सोमय्या यांनी पत्र लिहून कळवलं आहे. दुर्देवाची बाब म्हणजे अद्याप पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. फक्त तक्रार नोंद केली आहे अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे.