अक्कलकोट, दि.१० : राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार शाखेत काम करणाऱ्या आयटी असिस्टंटचे मानधन अनेक दिवसांपासून रखडले आहे.
याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे
या कंपनीकडून ८ मार्च २०१९ रोजी चे सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये नियुक्ती देण्यात आलेली आहे. कंपनीकडून शासन निर्णयातील नियम अटी आधीन राहून राज्यात सुमारे चारशेपेक्षा जास्त असिस्टंट यांना नियुक्ती देण्यात आली आहे. सदर कर्मचारी कार्यालयातील कार्यालय प्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजना शाखेतील कामकाजा व्यतिरिक्त कार्यालय प्रमुख व वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितलेली कामे जसे की निवडणुकीची कामे महसूल संकलनाचे कामे कोविड – १९ चे कामकाज देखील जबाबदारीने आज अखेर परत प्रामाणिकपणे व कामकाज केलेले आहेत व करत आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२० असे सहा महिने झाले अद्याप मानधन दिलेले नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे त्यामुळे कर्मचारी यांना भुर्दंड सोसावा लागत आहे. गेल्या चार महिन्यापासून संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे महामारी आल्याने संपूर्ण देश तीन ते चार महिने लॉकडाऊन असले तरी सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलून कामे करून घेण्यात आले आहे. जसे की कोविड -१९ ची कामे व कार्यालयीन इतर कामकाज करून घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे पुढील महिनाभरात दसरा दिवाळी हा सण आलेला आहे. सदर कर्मचारी यांच्याकडे पैसाच नसल्याने दिवाळीत शिमगा होतो की काय असा परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी शासनाने या प्रकाराकडे त्वरित लक्ष देऊन सदर कर्मचारी यांचे थकीत सहा महिने मानधन लवकरात लवकर देऊन सदरचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.