सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून तिसरा दिवस ऑस्ट्रेलिया संघाच्याच नावावर राहिला. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण १९७ धावांची आघाडी आहे.
या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३८ धावांचा आवाहनाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव तिसऱ्या दिवशी २४४ धावांवर रोखला. त्यानंतर दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 197 धावांची आघाडी घेतली आहे.
वॉर्नर आणि फुकोव्हकी यांना बाद करत भारताने ऑस्ट्रलियाला दोन झटके दिले. मात्र, तिसऱ्या दिवसाखेर लाबुशेन आणि स्मिथ यांनी चांगली खेळी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लाबुशेन 47 तर स्मिथ 29 धावांवर नाबाद होते. भारताकडून सिराज आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.