ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तुमच्या खिशावर परिणाम करणारे हे 5 नियम 1 फेब्रुवारीपासून बदलणार ; जाणून घ्या

नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी 2021 पासून सरकार काही नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. चला तर मग त्या बदलांविषयी जाणून घेऊयात …

 

1. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलेंडर आणि कमर्शियल सिलेंडरच्या किंमती ठरवतात. त्यानुसार 1 फेब्रुवारीला सिलेंडरच्या किंमती बदलल्या जाईल. तथापि, जानेवारीत कंपन्यांनी किंमती वाढवल्या नाहीत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एलपीजीच्या किंमती 2 पट वाढल्या आहेत.

 

2. पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर हे जाणून घ्या की, 1 फेब्रुवारीपासून पीएनबी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करणार आहे. देशभरातील वाढती एटीएम (ATM) फसवणूक थांबविण्यासाठी पीएनबीने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. जर तुमचेही पीएनबीमध्ये बँक खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. 1 फेब्रुवारीपासून पीएनबी ग्राहकांना ईएमव्ही (EMV) नसलेल्या एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार नाहीत.

 

3. Air India Express ने नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे जाहीर केली आहेत. Air India Express फेब्रुवारी ते 27 मार्च 2021 दरम्यान त्रिची आणि सिंगापूर दरम्यान दररोज फ्लाइट सुरू करेल. या मार्गावर कुवैत ते विजयवाडा, हैदराबाद, मंगलोर, त्रिची, कोझिकोड, कुन्नूर आणि कोची असे अधिक कनेक्शन असतील. याआधीही एअर इंडिया एक्सप्रेसने जानेवारीपासून अनेक उड्डाणे जाहीर केलेली आहेत.

 

4. 1 फेब्रुवारी 2021 रोजी मोदी सरकार आपले बजट सादर करणार आहे. असे मानले जात आहे की, सरकार फर्निचरसाठीचा कच्चा माल, तांबे भंगार, काही रसायने, दूरसंचार उपकरणे, रबर उत्पादने, पॉलिश हिरे, रबर वस्तू, चामड्याचे कपडे यासह अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी (Custom duty) 20 टक्क्यांपेक्षा जास्त कस्टम ड्युटी कमी करता येईल. दूरसंचार उपकरणे आणि कार्पेट्स सारखी उत्पादने याशिवाय फर्निचर बनवण्यासाठी वापरल्या गेलेल्या काही न वापरले गेलेले लाकूड आणि हार्डबोर्ड इत्यादीवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे रद्द केली जाऊ शकते. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक उत्पादने स्वस्त होऊ शकतात.

 

5. पीएमसी बँकेच्या एडमिनिस्ट्रेटरने बँकेला पुन्हा उभे करण्यासाठी 1 फेब्रुवारी पर्यंत गुंतवणूकदारांना आपली ऑफर देण्याची अंतिम मुदत दिली आहे. Centrum Group-BharatPe यासारख्या काही गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे ऑफर केली आहे. याशिवाय UK ची कंपनी Liberty Group नेही आपली ऑफर सादर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!