ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘त्या’ ट्विटमुळे अमृता फडणवीस पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर

मुंबई – मुंबई – माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा नेटीझन्सच्या रडारवर आल्या आहेत. अमृता फडणवीस विविध कारणांमुळे अनेकदा सोशल मीडियात चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना कधी गाण्यामुळे तर कधी त्यांच्या राजकीय टोलेबाजीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, यातच आता अर्थसंकल्पावर अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियात त्यांना ट्रोल केले जात आहे.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले होते. गेल्या 100 वर्षात देशात असा अर्थसंकल्प कधी सादरच झालेला आपण पाहिलाच नाही. कोणतेही अतिरिक्त कर न लादता विकासाला चालना कशी द्यायची, याचा हा अर्थसंकल्प उत्तम नमुना आहे. या अर्थसंकल्पातून जगातील इतर देशांनाही खूप काही शिकण्यासारखे असल्याचे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

या प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस यांना सोशल मीडियात चांगलेच ट्रोल करण्यात आले, स्वातंत्र्याला १५० वर्ष तरी पूर्ण झाली आहेत का? देशाला ७३ वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले आणि गेल्या १०० वर्षाच्या बजेटबद्दल बोलत असल्याचे म्हणत नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली. तर एका युजरने सांगितले की, स्वतंत्र हिंदुस्तानाचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला गेला, देशाला स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्ष झाल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!