ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिलासादायक ! जून नंतर प्रथमच देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

नवी दिल्ली :  देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जून २०२० नंतर प्रथमच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या २४ तासांत १२ हजार ५८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर  गेल्या २४ तासांत देशात १६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने दगावणाऱ्यांचा आकडा ०१ लाख ५१ हजार ३२७ वर पोहोचला आहे. तर, देशात १२ हजार ५८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यानंतर आतापर्यंत देशाभरातील कोरोना रुग्णांची संख्या ०१ कोटी ०४ लाख ७९ हजार १७९ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात १८ हजार ३८५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांचा एकूण आकडा ०१ कोटी ०१ लाख ११ हजार २९४ वर पोहोचला आहे. गेल्या १८ दिवसांत देशभरात ३०० हून कमी रुग्ण दगावल्याची आकडेवारी समोर आली आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्क्यांवर पोहोचला असून, मृत्युदर १.४४ टक्क्यांवर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!