ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिशा मेडिकलमुळे अक्कलकोटचे नाव निश्चितच उंचावेल : मणूरे

अक्कलकोट  : अक्कलकोटमध्ये नववर्षाच्या मुहूर्तावर विजय चौकात दिशा परिवाराच्यावतीने नूतन मेडिकल फर्मचा शुभारंभ करण्यात आला. या भव्य अशा दिशा मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणूरे यांच्या हस्ते करण्यात आले.अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक के.एस. पुजारी, महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष गंगाधर कापसे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव,संचालक वसीम सुलतान,देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अक्कलकोट मुस्लिम समाज ट्रस्टचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली, नगरसेवक नसरोद्दीन मुतवल्ली,इम्रान मुतवल्ली यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांचे स्वागत विलास कोरे आणि सत्कार एजाज मुतवल्ली यांनी केले.

यावेळी बोलताना बसवराज मणूरे म्हणाले की,अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागांमध्ये अशा मोठ्या मेडिकलची गरज होती.ही गरज ओळखून दिशा परिवाराने एकाच छताखाली ऍलोपॅथी, आयुर्वेदिक, जेनरिक मेडिसिन, जनावरांची औषधे, कॉस्मेटिक आणि सर्जिकल अशा सर्वच प्रकारची औषधे एकत्रित ठेवली आहे.दिशा परिवाराच्या उपक्रमामुळे अक्कलकोटचे नाव निश्चितच उंचावेल,

असा विश्वास बसवराज मणुरे त्यांनी व्यक्त केला.यावेळी सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर घाळे, सचिव राजेश बारोळे, खजिनदार, राजशेखर विरपे,माजी जिल्हाध्यक्ष कय्युमभाई इनामदार, अक्कलकोट शहर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदीप घिवारे,डॉ.विपुल शहा, डॉ.विवेक करपे, डॉ. गिरीश साळुंके, डॉ.लिंगराज बोकडे, माजी उपनगराध्यक्ष अ.गफूर शेरीकर, नगरसेवक सद्दाम शेरीकर, समीर शेख, विलास कोरे,प्रा.प्रकाश सुरवसे, मल्लिनाथ मसूती, शिवानंद नंदर्गी, मनोज काटगाव,उमेश कापसे, शिवशरण जोजन

धनराज शिंदे, फरीद जमादार,मतीन पटेल ,रजाक सय्यद, युनूस बागवान आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले. आभार एजाज मुतवल्ली मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!