दुधनी, दि.२१ : ( गुरुराज माशाळ) अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांभवी फौंडेशनच्यावतीने महिलांसाठी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन शांभवी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशालीताई म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे), डॉ. शैलजा चिंचोळी यांच्या हस्ते कोमल उदयकुमार म्हेत्रे, शांभवी शंकरराव म्हेत्रे, लक्ष्मी उमेश म्हेत्रे यांच्या उपस्थितीत लिं. गुरुशांतलिंगेश्वर म्हास्वामीजींच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या मोफत स्त्री रोग तपासणी शिबिरात ८० महिलांनी लाभ घेतला.यावेळी डॉ. सुप्रिया संगोळगी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, शांभवी फौंडेशनने मकर संक्रांत निमित्त मोफत स्त्री रोग तपासणी शिबीर आयोजन करून उल्लेखनीय काम केले आहे. शहरातील महिला आरोग्यदायी राहावे ,असे यामागचा उद्देश आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, डॉ. उदयकुमार म्हेत्रे, संगमनाथ म्हेत्रे, डॉ. गुरुशांत चिंचोळी, राजू म्हेत्रे, लक्ष्मीपुत्र हबशी, रामचंद्र गद्दी, मलकण्णा गद्दी, गुरुशांत हबशी, दयानंद म्हेत्रे, श्रीशैल माळी, एकनाथ मोसलगी, शरणगौडा पाटील, चंद्रकांत कामजी, शंकर बंदराड, राजू कदम, काशिनाथ यरगल, तम्मण्णप्पा कोटनूर, मलकण्णा गद्दी, रितेश कोटनुर, महेश कोटनुर, मनोज गद्दी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.