दुधनी रेल्वे स्टेशन येथे माल वाहतुक धक्क्याला मंजुरी; माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते शुभारंभ
दुधनी दि. १० : तालुक्यातील दुधनी रेल्वे स्टेशन येथे २०१५ पासुन पाठपुरावा करण्यात येत असलेल्या माल वाहतुक धक्क्यास मंजुरी मिळाली असुन बुधवार रोजी या माल वाहतुक धक्क्याचे शुभारंभ माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याहस्ते मातोश्री शुगरच्या कोलकत्ता येथे जाणार्या साखर पोत्याचे पुजन करुन करण्यात आले.
याप्रसंगी रेल्वेचे एस.एस.सी (पीडब्ल्युएवाय) दुधनी इनचार्ज विनोदकुमार सि.पी. ठेकेदार महेश कोनापुरे, परेश सुराना, सिद्धेश्वर मुनाळे, बुकिंग सुपर्वायझर सि.के वेलुकेशवन, पंचायत समिती सदस्य आनंदराव सोनकांबळे, दत्ता डोंगरे, राजकुमार लकाबशेट्टी आदिंची प्रमुख़ उपस्थिती होती.
दुधनी हे गाव व्यापारी गाव म्हणुन ओळखला जात असुन येथे रेल्वेची व्यवस्था असल्याने दुधनीसह परिसरातील अनेक गांवाना याचा चंगल्या पद्धतीने फायदा झाला आहे. २०१५पासुन याठिकाणी माल वाहतुक धक्का सुरुवात करण्यात यावी याकरीता माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन माल धक्क्यास मंजुरी मिळाली आहे. रेल्वेची डबल लाईन सुरु झाल्याने मालवाहतुकीस सोयिस्कर होणार आहे. या धक्क्यामुळे अक्कल्कोट तालुक्यातील मातोश्री शुगर, गोकुळ शुगर, गोकुळ माऊली शुगर, जय हिंद शुगर, कर्नाटकतील रेणुका शुगर, एन.एस.एल शुगर भुसनुर, के.पी.आर शुगर आलमेल, जमखंडी युनीट-२, मनाली शुगर जमखंडी, बेनुर येथील कारखान्यांचे साखर देशातील वेग-वेगळ्या राज्यात पोहोचविण्यासाठी मद्त होणार आहे. एका हंगामात या कारखान्याचा रेल्वेने सहकार केल्यास सुमारे साठ लाख गोणीचे निर्यात होऊ शकते. यामुळे रेल्वेच्या महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्याच प्रमाणे दुधनी हे गाव मोठा व्यापारी शहर असल्याने या धक्क्यावर आयात व निर्यात दोन्हीची व्यवस्था असल्याने येथील मार्केटमधील व्यापारालाही नवी दिशा मिळणार आहे.
या माल वाहतुक धक्क्यावर सुमारे ४२ व्यागन एका वेळेस लोडींगसाठी उभे राहु शकतात. या ठिकाणी सुमारे चारशे मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये फर्टीलायझर व्यवसायासही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. शेतकरी व व्यापारी यांचे माल देखील निर्यात करण्यास याचा फायदा होणार आहे. या मालवाहतुक धक्क्यास मंजुरी मिळाल्याने दुधनी शहरातील उद्योग धंदे वाढण्यास चालना मिळणार आहे.
यावेळी गुलाबसाब खैराट, रामचंद्र गद्दी, गुरुशांत हबशी, दयानंद म्हेत्रे, शांतलिंग परमशेट्टी, शंकर राठोड, रवी नारायणकर, विश्वनाथ हडलगी, हमाल संघटना अध्यक्ष सुरेश बडदाळ आदिंसह परिसरातील नागरीक उपस्थीत होते.