ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित, शेतकऱ्यांचे योगदान विसरता येणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

 

दिल्ली,दि.१६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित केल्या.

देशात अन्नधान्याची क्रांती घडवून आणायचे
असेल तर शेतकरी हा घटक महत्त्वाचा मानावा लागेल. covid-19 च्या काळातही शेतकऱ्यांची भूमिका अतिशय मोलाची राहिलेली आहे, त्यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही,असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.ते आज नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या 75 व्या वर्षपूर्ती समारंभानिमित्त बोलत होते.देशातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून स्वच्छतेबाबतही विशेष प्रयत्न केले जात आहेत, असे मोदी यांनी सांगितले.यावेळी कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल 130 कोटी भारतीयतर्फे कृतज्ञता म्हणून 75 रुपये मूल्य असलेल्या स्मरण नाण्याचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!