मुंबई : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीतील सोन्याचा वायदा भावात 0.36 टक्की तेजी आली आहे. तर मार्चमधील चांदीचा वायदा भावात 1.67 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून सोने-चांदीवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे सोन्याच्या किंमती गेल्या दोन सत्रात 1,800 रुपयांनी खाली आल्या आहेत. बुधवारी मल्टी कॉमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीच्या सोन्याचा वायदा भाव 174 रुपयांनी वाढून 47,925 रुपए प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे तर एक किलोग्रॅम चांदीची किंमत 1,125 रुपयांनी वाढून 68,666 रुपयांवर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मतबूतीमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमती 0.4 टक्क्यांनी वाढून 1,844.48 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. तर यावेळी चांदीचा भाव 3.2 टक्क्यांनी वधारत 27.25 डॉलर प्रति औंस झाला आहे.