ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक ! प्रेमीयुगुलाची चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर | जिल्ह्यातील मोहोळ शहरातील बी.पी.एड. महाविद्यालयाच्या आवारात प्रेमीयुगुलांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेमीयुगलांनी घेतलेल्या या गळफासामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे.

मोहोळ शहरातील बी.पी.एड. महाविद्यालयाच्या आवारात एका जोडप्याने गळफास घेतला. ही माहिती परिसरातील काही नागरिकांना समजली. या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा या प्रेमीयुगुलांनी स्कार्फच्या साहाय्याने दोघांनी एकत्र गळफास घेतल्याचे दिसले.

पोलिसांनी या दोघांनाही फासावरून खाली उतरवले. व उत्तरिय तपासणीसाठी रुग्णलायत हलवले आहे. प्रेमसंबंधला घरच्यांनी नकार दिला असल्याने त्यांनी आत्महत्या केली. असा अंदाज व्यक्त केला जात. मात्र तरीही ही आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झाले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!